You are currently viewing किल्ला वाहतूक, स्कुबा डायव्हिंग, जलक्रीडा व्यवसाय, नौका विहार, पॅरासिलींग संबंधी परवानग्या त्वरित मिळाव्यात…

किल्ला वाहतूक, स्कुबा डायव्हिंग, जलक्रीडा व्यवसाय, नौका विहार, पॅरासिलींग संबंधी परवानग्या त्वरित मिळाव्यात…

मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांची महाराष्ट्र मेरिटाईम बाॅर्ड, मुंबई यांच्याकडे मागणी..

सिंधुदुर्ग :

महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड,मुंबई यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी वॉटर स्पोर्ट्स, नौका विहार, पॅरासीलिंग संबंधी परवानगी मिळावी यासाठी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे.सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला असून जिल्ह्यामध्ये देशी – विदेशी पर्यटकांचा ओघ वाढत आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मालवण किल्ल्यासह इतर समुद्रकिनारे, खाडी क्षेत्र यामध्ये प्रामुख्याने बोटिंग, विविध वॉटर स्पोर्ट्स पॅरासिलींग, नौका विहार यासाठी विविध ठिकाणाहून पर्यटक सिंधुदुर्गात येत आहेत. या पर्यटकांच्या पर्यटनाकरीता अनेक युवक एकत्रित येवून संस्थेच्या माध्यमातून आणि वैयक्तिक स्वरूपात असे व्यवसाय करण्यात पुढे येत स्वावलंबी बनत आहेत.अनेक कुटुंबांना रोजीरोटी प्राप्त होत आहे.परंतु मागील कोरोना काळापासून आपल्या कार्यालयातून संबंधित व्यवसायाकरीता परवानग्या बंद करण्यात आल्याचे समजते. यामुळे नवीन व्यवसाय व नूतनीकरण करणारे संस्था तसेच युवकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पर्यायी सर्व परवान्याशिवाय व्यवसाय करण्यास प्रवृत्त होत असून, कायदेशीर कारवाईला सामोरे जात आहेत. तरी किल्ला वाहतूक, स्कुबा डायव्हिंग जलक्रीडा व्यवसाय, खाड्यांमधील प्रवासी वाहतूक, वॉटर स्पोर्ट व पॅरासिलिंग अशा व्यावसायिकांना परवानगी संबंधी कार्यवाही त्वरित करून, संबधित व्यावसायिकांना तात्काळ परवानग्या मिळाव्यात असा उल्लेख असुन हे निवेदन गणेश कदम मनसे लॉटरी सेना अध्यक्ष यांच्या हस्ते देत चर्चा करण्यात आली. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सैनी हे सकारात्मक असुन लवकरच परवानग्या देणार असल्याचे सांगितले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा