कणकवली
मालवण ते कोल्हापूर जाणाऱ्या एस.टी. फेरीचे आज कणकवली बसस्थानकात स्वागत करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, प्रवासी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी या बसफेरीतील चालक आणि वाहकांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार केला.
सिंधुदुर्गातून कोल्हापूरला मोठ्या प्रमाणात प्रवासी जा-ये करतात. त्यांच्यासाठी सिंधुदुर्ग विभागातून एस.टी.सेवा सुरू करा अशी मागणी ज्येष्ठ नागरिक सेवा संघ तसेच प्रवासी महासंघाकडून करण्यात आली होती. याबाबतचे निवेदनही एस.टी.चे विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांना देण्यात आले होते. त्यावेळी श्री.रसाळ यांनी पुढील आठवडा भरात कोल्हापूरला जाण्यासाठी एस.टी. सेवा सुरू करण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार आज मालवण ते कोल्हापूर जाणारी एस.टी. बस कणकवली स्थानकात सकाळी आठ वाजता दाखल झाली. या बसफेरीतील चालक आणि वाहक यांचे स्वागत ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे दादा कुडतरकर, प्रवासी संघाचे अध्यक्ष मनोहर पालयेकर, परेश परूळेकर, सायली परुळेकर आदींनी केले.