केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची माहिती;उद्योग खात्याच्या विविध योजनांची देणार माहिती
केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या संकल्पनेतून एमएसएमईचे तज्ञ मार्गदर्शक २१ जानेवारी ते २३ जानेवारी या तीन दिवसाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या मार्फत उद्योजकांना मार्गदर्शन करण्यात येणार असून लघु सुक्ष्म आणि मध्यम उद्योग खात्यातील वेगवेगळ्या उद्योग विषयातील योजना याची माहिती ते देणार आहेत.
यावेळी नावीन्यपूर्ण उद्योगांची ओळखही करून देण्यात येणार आहे. त्यामुळे हे मार्गदर्शन शिबीर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व उद्योजकांसाठी महत्त्वपूर्ण आहे.
यावेळी उद्योगांसाठी आवश्यक असणारी आधुनिक टेक्नॉलॉजी, अर्थपुरवठा, केंद्र शासनाकडून मिळणारी सबसिडी याचेही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच ह्या योजनांचा लाभ घेण्यासाठी योग्यती मदत देखील केली जाणार आहे. तरी या मार्गदर्शन कार्यक्रमाचा जिल्हावासीयांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, अधिक माहितीसाठी ९४२०२०६८७३ या नंबरवर संपर्क करावा. तसेच स्वतःचे नाव, यूनिटचे नाव व पत्ता (नसल्यास ‘नवीन असे लिहावे), मुख्य / प्रस्तावित उत्पादने, ईमेल आयडी याबाबतची माहिती वर नमूद नंबरवर पाठवावी, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली आणि भाजपा उदयोग, व्यापार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी केले आहे.