You are currently viewing नांदगाव किक्रेट स्पर्धेत तिवरे संघ विजेता तर स्वामी फोंडाघाट उपविजेतेपद

नांदगाव किक्रेट स्पर्धेत तिवरे संघ विजेता तर स्वामी फोंडाघाट उपविजेतेपद

नांदगाव

कणकवली तालुक्यातील नांदगाव चॅम्पियन बॉईज आयोजित  भव्य क्रीकेट स्पेर्धेत जय भवानी तिवरे संघ विजेता ठरला तर स्वामी फोंडाघाट उपविजेतेपद पटकाविले आहे.
नांदगाव येथील श्री देव कोळंबा मैदानात गेले चार दिवस भव्य खुल्या क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न झाले.
पारितोषिक वितरणावेळी भाजपचे तालूका सरचिटणीस व असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, नांदगाव उपसरपंच निरज मोरये, ग्रामपंचायत सदस्य मजिद बटवाले, सामाजिक कार्यकर्ते रज्जाक बटवाले ,राजा नावलेकर , यासीर मास्के ,सचिन हळदणकर,सद्दाम कुणकेरकर, उसेनमिया बटवाले,रशिद पाटणकर,गवस साठविलकर, दिपक तांबे, इम्रान हवालदार, इम्रान बटवाले तसेच मंडळाचे कार्यकर्ते रोहन जोशी,आलीम बटवाले,अमिर बटवाले, सर्फराज बटवाले, रोहीत जोशी, इशांत नावलेकर ,साकीब मानाजी ,तोहीत जेठी आदी उपस्थित होते.
यावेळी विजेता संघ ला जय भवानी तिवरे यांना रोख रक्कम 15,000/- पंढरी वायंगणकर व मजिद बटवाले तर उपविजेतेपदाला स्वामी फोंडाघाट 10,000/- हजार अबिद नाईक पुरस्कृत देण्यात आले आहे.
तर उत्कृष्ट फलंदाज व मालिका विर रजत कदम , सामनावीर ओमकार वाळवे , शिस्तबद्ध संघ रामेश्वर असलदे , क्षेत्ररक्षक विवेक हडकर , यष्टिरक्षक फय्याज काझी , गोलंदाज गौरव सर फोंडाघाट संघ यांना ही वैयक्तिक आकर्षक पारितोषिक देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × four =