वैभववाडी
श्री बंड्या मांजरेकर मित्र मंडळ नाधवडे आयोजित पार पडलेल्या बैलगाडा शर्यतीत समीर बने देवरुख ता. संगमेश्वर यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक द्वारकानाथ माने ता. लांजा यांनी पटकावला. तर तृतीय क्रमांक राजाराम चव्हाण ता. संगमेश्वर यांनी पटकावला. या स्पर्धेत रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
बैलगाडा शर्यतीला परवानगी शासनाकडून मिळाल्यानंतर कोकणात पहिली स्पर्धा नाधवडे येथे पार पडली. स्पर्धा जाहीर होताच प्रशासन खडबडून जागे झाले होते. स्पर्धेच्या ठिकाणी सकाळपासून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्यासह सहाय्यक पोलीस निरिक्षक, पोलीस उपनिरीक्षक व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेचे उद्घाटन अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते पार पडले. बक्षीस वितरणही श्री बगाटे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी वैभववाडी सभापती अक्षता डाफळे, देवगड सभापती रवी पाळेकर, कणकवली सभापती मनोज रावराणे, पोलीस निरीक्षक अतुल जाधव, पोलिस उपनिरीक्षक प्रविण देसाई, श्री तुळशीदास रावराणे, श्री. कानडे, बाळा जठार, बाप्पी मांजरेकर, प्रकाश पारकर, सरपंच श्रीम. कुडतरकर, बंड्या मांजरेकर, सुधीर नकाशे व नाधवडेतील पदाधिकारी उपस्थित होते.
प्रथम क्रमांक पटकावलेल्या समीर बने यांना रोख रुपये 11111 व चषक देऊन गौरविण्यात आले. द्वितीय क्रमांक पटकाविलेले श्री. द्वारकानाथ माने यांना 7777 व चषक देऊन गौरविण्यात आले. तृतीय क्रमांक राजाराम चव्हाण यांना 5555 व चषक देऊन गौरविण्यात आले. उत्तेजनार्थ रोशन किरवे देवरुख, उत्कृष्ट चालक सिरील फर्नांडिस कुडाळ घावनळे, उत्कृष्ट जोडी बळीराम पांचाळ चुनागोळवण राजापूर यांना रोख बक्षिसे व चषक देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेला हजारोंच्या संख्येने हौशी प्रेक्षक व नागरिकांनी गर्दी केली होती. तसेच या स्पर्धेला महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य, पशु व ग्रामपंचायत यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्पर्धा यशस्वी पार पाडल्याबद्दल पोलीस प्रशासन व इतर सर्व प्रशासनाचे व प्रेक्षकांचे आयोजक बंड्या मांजरेकर यांनी आभार मानले.
WhatsAppFacebookTwitterGmailShare