You are currently viewing लोरे नंबर १ ग्रामपंचायत च्या शिबिरात १०० लाभार्थ्यांचे ई- श्रमिक कार्ड चे केले प्रस्ताव

लोरे नंबर १ ग्रामपंचायत च्या शिबिरात १०० लाभार्थ्यांचे ई- श्रमिक कार्ड चे केले प्रस्ताव

कणकवली

१०० लाभार्थ्यांचे ई- श्रमिक कार्ड चे प्रस्ताव तर १५० लाभार्थ्यांचे बांधकाम कामगार नोंदणी व नूतनीकरण प्रस्ताव लोरे नंबर १ ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आले.सभापती मनोज रावराणे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच श्री. अजय रावराणे, उपसरपंच श्रीम.रोहिणी रावराणे, यांच्या पुढाकाराने गावात हे शिबीर घेण्यात आले.

ग्रामपंचायत लोरे नंबर १ च्या सभागृहात दोन दिवस ई-श्रमिक कार्ड व बांधकाम कामगार नोंदणी व नूतनीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी पंचायत समिती कणकवली चे सभापती श्री. मनोज रावराणे , सरपंच श्री. अजय रावराणे, उपसरपंच श्रीम.रोहिणी रावराणे, ग्रामसेवक श्री.ऋतुराज कदम आणि ग्रामपंचायत सदस्य श्री.अनंत रावराणे, श्री.नरेश गुरव,श्री.काशिराम नवले, श्रीम.पूनम मोसमकर, श्रीम.सुनीता नापणेकर , श्रीम.रसिका राणे व कर्मचारी उपस्थित होते.

जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत सदर योजनांचा लाभ व्हावा या हेतूने सभापती श्री. मनोज रावराणे व सरपंच श्री. अजय रावराणे यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून100 लाभार्थ्यांचे ई- श्रमिक कार्ड चे प्रस्ताव तर 150 लाभार्थ्यांचे बांधकाम कामगार नोंदणी व नूतनीकरण प्रस्ताव या शिबिराच्या माध्यमातून शासनास सादर करण्यात आले.कार्यक्रम प्रसंगी बोलताना सरपंच अजय रावराणे यांनी वेळोवेळी येणाऱ्या शासनाच्या योजना अधिकाधिक कार्यक्षमतेने माझ्या ग्रामस्थांपर्यंत पोहोचवण्यास आपण सतत प्रयत्नशील राहू असे आश्वासन केले

प्रतिक्रिया व्यक्त करा