You are currently viewing कोरोना शिक्षक समितीने केलेले कार्य आदर्शवत  – समीर नलावडे

कोरोना शिक्षक समितीने केलेले कार्य आदर्शवत  – समीर नलावडे

राज्य प्राथमिक शिक्षक समिती कणकवली व जिल्हा सामान्य रुग्णालय अंतर्गत रक्तदान

कणकवली

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कणकवली संघटनेने कोरोना कालावधीत केलेले कार्य हे सर्वांनाच प्रेरणादायी व आदर्शवत असेच आहे. समाजाचे आपण देणे लागतो या भावनेने त्यांनी केलेले रक्तदान हेदेखील त्याचाच एक भाग आहे.’ असे प्रतिपादन कणकवली नगरपंचायतचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, हे ब्रीदवाक्य मानून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कणकवली शाखेने परमहंस भालचंद्र संस्थानातील काशीभवन येथे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सहकार्याने शिक्षकांचे रक्तदान शिबिराचा उपक्रम आयोजित केला होता.

कणकवली तहसीलदार रमेश पवार म्हणाले, “कणकवली शिक्षक समिती संघटना ही शैक्षणिक व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली संघटना आहे. शैक्षणिक उपक्रम राबवत असताना सामाजिक बांधिलकी ठेवून रक्तदानासारखे महत्कार्य करणारी शिक्षक समिती कणकवली संघटनेचे कार्य उल्लेखनीय असेच आहे. ‘गटशिक्षणाधिकारी किशोर गवस म्हणाले, “शिक्षक समितीचे उपक्रम हे समाजोपयोगी व शैक्षणिक असून कणकवली शाखेने अतिशय स्तुत्य उपक्रम राबवले आहेत.” जिल्हाध्यक्ष नितीन कदम म्हणाले, “कणकवली शिक्षक समितीने राबवलेले उपक्रम हे सर्व समाजाला आणि शिक्षकांना प्रेरणा देणारे आहेत.” त्यांनी शाखेच्या कार्याबद्दल मुक्तकंठाने स्तुती केली व शुभेच्छा दिल्या.

त्यावेळी कणकवली तालुका गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष नितीन कदम, जिल्हा सरचिटणीस सचिन मदने, शिक्षक नेते गिल्बर्ट फर्नांडिस, जिल्हा कार्यालयीन चिटणीस संतोष कुडाळकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश झाडे, माजी कार्याध्यक्ष व मार्गदर्शक श्यामसुंदर म्हाडेश्वर, प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक आनंद तांबे, जिल्हा विभागीय अध्यक्ष महेंद्र पवार, आरोग्य पथक प्रमुख डॉ. आचरेकर व त्यांचे सहकारी, तालुका महिला सेल अध्यक्षा निकिता ठाकूर, महिला सचिव नेहा मोरे, परमहंस भालचंद्र संस्थानाचे व्यवस्थापक विजय केळुस्कर आणि समितीचे रक्तदाते उपस्थित होते.

रुपेश सुनिल गावकर, अमित प्रकाश हर्णे, निलेश देवीदास कडुलकर, स्नेहल संदीप गोसावी, श्रीकृष्ण नारायण कांबळी, निलेश लक्ष्मण ठाकूर, वल्लभानंद घनःश्याम प्रभू, प्रशांत पांडुरंग दळवी, श्रीकृष्ण शामसुंदर ठाणेकर, प्रकाश शांताराम बुचडे, योगेंद्र दिगंबर अंधारी, उदय रामचंद्र जाधव, प्रसाद मधुकर कांबळी, सिध्दण्णा शंकर दोडमणी, नवनाथ हिंदूराव चौगले, ईश्वरलाल अनंत कदम, प्रशांत प्रभाकर बोभाटे, संतोष कुडाळकर, विलीस चोडणेकर, उमेश मोरे, प्रिती मशिदकर, संतोष वळंजू, महेंद्र पवार, धीरज हुंबे, मंगेश तांबट, महेश चव्हाण आणि विनायक जाधव असे एकूण २७ जणांनी रक्तदान केले. तालुका सरचिटणीस सुशांत मर्गज यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल तालुकाध्यक्ष विनायक जाधव यांनी सर्वांचे आभार मानले. त्यावेळी बहुसंख्येने जिल्हा व तालुका पदाधिकारी, समितीचे पाईक उपस्थित होते. या शिबिरासाठी किरण कोरगावकर, प्रशांत बोभाटे, श्रीकृष्ण कांबळी, निलेश ठाकूर, प्रकाश बुचडे, श्रीकृष्ण ठाणेकर, समीर पाटील यांनी विशेष मेहनत घेतली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + 18 =