You are currently viewing गौरव

गौरव

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या ज्येष्ठ सदस्या कवयित्री लेखिका डॉ.निलांबरी गानू यांची काव्यरचना

भारत मातेच्या पायी वाहिली
फुले कर्तृत्वाची

सत्य अहिंसा त्याग बनली
ध्येय सर्वस्वाची

शुरविरांची कर्मभूमी ही
किर्ती भारताची

ललनांचे ही शौर्य साहस
शान भारताच

रक्तात वाहे देश प्रेम ही
….. नीती भारताची

शत्रु सही जिंके प्रेम बोली ही
ख्याती भारताची

जे जे उत्तम ते ते भारतीय
गर्दी शुभेच्छांची

काळे-गोरे दिपूनिया देती
फुले गौरवाची

नीलांबरी गानू
राजगुरुनगर पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा