You are currently viewing विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल येथे माजी विद्यार्थिनी डॉ.गृहीता राव यांचा सन्मान.

विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल येथे माजी विद्यार्थिनी डॉ.गृहीता राव यांचा सन्मान.

डॉ. गृहिता यांनी रशियन यूनिवर्सिटी मधून घेतल एम.बी.बीएस. शिक्षण.

वेंगुर्ला

राज्य शासनाच्या सर्व शाळांमध्ये ३ ते १२ जानेवारी या कालावधी दरम्यान “जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा अभियान “राबवण्यात येते आहे. ६ जानेवारी रोजी यशस्वी महिलांच्या यशोगाथा अंतर्गत सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल येथे डॉ. गृहिता राव यांच्या सन्मान करण्यात आला.
डॉ. गृहीता हर्षद राव या सावंतवाडी येथील असून त्यांनी डोंबिवली येथे सातवीपर्यंतचे शिक्षण घेतले त्यानंतर सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल वेंगुर्ला मध्ये सातवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेत त्यांनी बॅ. खर्डेकर कॉलेज वेंगुर्ला येथे अकरावी व बारावीचे शिक्षण घेतले. त्या सध्या मेडिकल ऑफिसर गव्हर्नमेंट हॉस्पिटल वेंगुर्ला येथील मेडिकल ऑफिसर या पदावर आहेत.

सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल मधून दहावीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी पुढील ७ वर्षे रशियन यूनिवर्सिटी मध्ये एम बी बी एस डिग्री कोर्स पूर्ण केला, त्यानंतर भारतामध्ये सेवा देण्याचं ठरवून यांनी ‘कोरोना वॉरियर’ म्हणून सीपीआर हॉस्पिटल, कोल्हापूर येथे आपली सेवा दिली. डॉ. गृहीता ह्या २६ वर्षाच्या असून एवढ्या लहान वयात ७ वर्षे देशाबाहेर रशियन यूनिवर्सिटी मध्ये सात वर्षे एम बी बी एस करून योग्य चिकाटीतून त्या डॉक्टर बनल्या. त्यानंतर मुंबई येथे त्यांचे सेवा द्यायचे लक्ष होते पण त्यावेळी सिंधुदुर्ग विद्यानिकेतनचे व्हॉइस प्रेसिडेंट इर्शाद शेख यांनी डॉ. गृहिता आणि त्यांच्या पालकांची भेट घेऊन त्यांना आपल्या वेंगुर्ला मध्ये सेवा करण्यासाठी विनवणी केली, त्यावेळी त्यांनी स्वतः वेंगुर्लामध्ये आपली सेवा देण्यास सुरुवात केली आहे.

इर्शाद शेख यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यामार्फत डॉक्टर कविता यांना सरकारी हॉस्पिटल वेंगुर्ला येथे मेडिकल ऑफिसर म्हणून अपॉईंट केले.
राज्य शासनाच्या सर्व शाळांमध्ये ३ ते १२ जानेवारी या कालावधी दरम्यान “जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा अभियान “राबवण्यात येते आहे. त्यामध्ये ३ तारखेला सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली त्यानंतर ४ तारीखला मासिक पाळी व वैयक्तिक स्वच्छता व त्याविषयीच्या अंधश्रध्दा यावर मुलींना मार्गदर्शन करण्यात आले, ५ तारीखला निबंध स्पर्धा,  दिनांक ६ जानेवारी २०२२ रोजी यशस्वी महिलांच्या यशोगाथा व मुलाखती अंतर्गत सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल येथे डॉ. गृहिता राव यांच्या सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमात सिंधुदुर्ग विद्यानिकेतन संस्थेचे चेअरमन इर्शाद शेख, डॉ. गृहिता यांचे वडील प्रो. हर्षद राव, आई सौ अस्मिता राव, मुख्याध्यापक मनीषा डिसोजा, दहावीचे विद्यार्थी व पालक तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा