You are currently viewing 15 ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना तळेरे हायस्कूलमध्ये लसीकरण

15 ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना तळेरे हायस्कूलमध्ये लसीकरण

वामनराव महाडीक विद्यालयातील विद्यार्थ्यांनीं घेतला कोविड प्रतिबंधात्मक पहिला डोस

वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय , तळेरे येथे कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहाय्याने कोव्हिड-19 प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरूवात झाली यावेळी कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्राचे समुदाय अधिकारी डाॕ. धनश्री जाधव , आरोग्य सहाय्यक गणेश तेली , आरोग्य सेविका सुचिता तळेकर , सायली मस्के , आशा सेविका संचिता तळेकर , अंगणवाडी सेविका नेहा वायंगणकर , रिया आंबेरकर , मुख्याध्यापक एस.जी.नलगे , ए.एस. मांजरेकर, सी.व्ही. काटे, डी.सी. तळेकर , एन. बी .तडवी, पी.एन. काणेकर , पी.एम.पाटील, ए.बी. कानकेकर , ए.पी.कोकरे , एन.पी गावठे, व्हि.केसरकर , प्रकाश घाडी , देवेद्र तळेकर , आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी , पालक विद्यार्थी आदी उपस्थित होते .


विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.जी. नलगे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या टीमचे स्वागत केले. विद्यालयाच्या वतीने न घाबरता विद्यार्थ्यांनी लस घेण्याचे आवाहन करण्यात आले होते त्याला विद्यार्थ्यांनींही उस्फुर्त प्रतिसाद दिला
विद्यालयातील कौस्तुभ तेरवणकर या विद्यार्थ्यांला लस देऊन लसीकरणाला सुरूवात करण्यात आली . लस घेतलेल्या विद्यार्थ्यांनीं इतरानां लस घेण्याचे आवाहन केले. यावेळी विद्यालयातील एकूण 143 विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली. माजी सभापती व शाळा समिती सदस्य दिलीपभाई तळेकर यांनी लसीकरण केंद्रावर भेट देऊन पाहाणी केली . रुग्णवाहिका व आवश्यक त्या सोईसुविधांसह काळजी घेत विद्यालयातील विद्यार्थ्यांचा लसीकरण टप्पा पूर्ण केल्याबद्दल अविनाश मांजरेकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संपूर्ण टीमचे आभार मानले

प्रतिक्रिया व्यक्त करा