You are currently viewing २५० मुलांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र विशेष अभियान राबवणार

२५० मुलांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र विशेष अभियान राबवणार

कणकवली पंचायत समिती सर्वसाधारण सभेत विविध प्रश्नांवर चर्चा

कणकवली

चांगल्या पद्धतीने रोजगार हमी योजना अंमलबजावणी केली जात आहे.आगामी काळात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण सर्वांनी विकासाकामांचे नियोजन गावात करावे. पियाळी नदी पात्रात सिलिका मायनींगचे दूषित पाणी सोडले जात आहे. त्या संदर्भात तहसीलदारांसोबत बैठक घेऊन संयुक्त पाहणी करूयात. येत्या काळात २५० मुलांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र विशेष अभियान राबवणार, असल्याची घोषणा कणकवली पंचायत समिती सभापती मनोज रावराणे यांनी सभागृहात केली.

कणकवली पंचायत समिती बैठक सभापती मनोज रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली भालचंद्र महाराज सभागृहात पार पडली.या सभेला गटविकास अधिकारी अभिजित हजारे, माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम,सुजाता हळदीवे, दिव्या पेडणेकर, पंचायत समिती सदस्य गणेश तांबे,मिलींद मेस्त्री, महेश लाड,हर्षदा वाळके,तृप्ती माळवदे,दळवी आदींसह सदस्य व खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते.

बंधारे दुरुस्ती किंवा नवीन बंधारे कामे सूचित करा.ग्रामीण रोजगार हमी योजनंतर्गत आम्ही सुचवलेले रस्ते यादीत का नाही?सभापती यांना देखील मी बोलले,नामंजूर यादीत नसेल काय करावे?अशी विचारणा माजी सभापती सुजाता हळदीवे यांनी केली,त्या विषयाला धरुन मिलींद मेस्त्री यांनी बोर्डवे रस्ता दीड वर्षे रखडलेला आहे.के करायचे ?यावर अधिकारी निरुउतर झाले होते.काम जास्त असेल तर कमी काम असलेला लोकांना काम द्या,असेही मागणी हळदीवे यांनी केली.येत्या १० दिवसांत कोणत्याही परिस्थितीत रस्त्यांचे प्रस्ताव मार्गी लावावेत,असे आदेश अधिकाऱ्याना सभापती मनोज रावराणे यांनी दिले.

गोठ्याचे प्रस्ताव आम्ही गेल्या वर्षी दिले होते,ते प्रलंबित का?दोन महिन्यांत आलेले प्रस्ताव मंजूर झाले,अशी सिस्टीम का?प्रथम आलेले प्रस्ताव अग्रक्रमाने घ्यावेत, अशी मागणी मंगेश सावंत यांनी केली.त्यावर सभापती यांनी सर्व राहिलेले प्रस्ताव मार्गी लावले जातील असे आश्वासन सभागृहात दिले.

ट्राय सायकल,कंपोस्ट खड्डे याबाबत माहिती देण्यात यावी,अशी मागणी सभागृहात मंगेश सावंत यांनी केली.त्यात विविध प्रश्न उपस्थित करत गटविकास अधिकारी यांना काही मुद्द्यांवर विचारणा केली, सभापती रावराणे म्हणाले, त्याची एजन्सी नियुक्ती केली होती,त्याबाबत ग्रामपंचायतला सर्व अधिकार आहे,असे सांगत पडदा टाकला.१५ वित्त आयोग विकासकामांची यादी तातडीने निश्चित करण्यात यावी,आपली निवडणुक पुढील काळात लागेल हे लक्षात ठेवा,अशी सूचना मंगेश सावंत व अन्य सदस्यांनी मांडली.

यावेळी असलदे रामेश्‍वर विकास सोसायटीच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल पत्रकार भगवान यांचा तर उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल सुधीर राणे यांचा पुष्पगुच्छ देऊन सभापती मनोज रावराणे यांनी सत्कार केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा