कुडाळ :
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता कोरोना वाढीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये नर्सिंग महाविद्यालय व फिजिओथेरपी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने १५,ते १८ वयोगटातील मुलांसाठी कोव्हॅक्सिन च्या डोसची उपलब्धता करून देण्यात आली आहे. शिक्षण घेताना १५ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना लसी अभावी अनेक गैरसोयींना सामना करावा लागत होता.ही गैरसोय दूर करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठीसाठी च्या लसिकरणाचा बॅ नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी आग्रह धरला होता.त्यांची ही विनंती मान्य करून बॅ नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये कोव्हॅक्सिंनची लस(१५०डोस) सकाळी ९ ते दुपारी २ यावेळेत उपलब्ध करून देण्यात आली आहे.तरी याचा गरजूनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन बॅ नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालय व नर्सिंग महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.