मराठा समाजाच्या वतीने दिल्या शुभेच्छा
कणकवली
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर विजयी झालेल्या मराठा समाजाच्या संचालकांचा मराठा समाजातर्फे सत्कार करण्यात आला. यात समीर रमाकांत सावंत व विठ्ठल देसाई या दोन्ही संचालकांचा मराठा समाजातर्फे सत्कार करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मराठा समाजाचे महेश सावंत, बच्चू प्रभुगावकर, महेंद्र सांब्रेकर, भाई परब, सुशील सावंत, सोनू सावंत, बबलू सावंत, समीर परब, शेखर राणे, सुशांत दळवी आदी उपस्थित होते.