जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी प्रमोद सूर्यवंशी यांनी अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या स्मृती जागवणारी काव्यरचना
१४ नोव्हेंबर १९४७ या दिवशी
वर्धा या महान गावात जन्मली
नाव होत त्या गोड मुलीच सिंधू
चिंधी टोपणनावाने ओळखली … १
जाणता अजाणता त्याचं
लहानवयातच लग्न झालं
संसाराच ओझं लहानवयात
त्यांनी अंगावर सदा झेललं …२
संसाराचा गाडा चालवतांना
विचार मनात खरोखर आला
शिक्षण घेऊन मोठे होऊ या
हाच ध्यास यांनी मनात धरला
… ३
नाव गाजलं साऱ्या जगात आज
सिंधुताई सपकाळ प्रेमळ माय
समाजसेविका झाली जगाची
जशी असती सदा दुधावरची साय … ४
जगाला वाटत आहे खूप खूप
सिंधुताईचा आज ही अभिमान
प्रेमळ, दयाळू ,काळजी करते
म्हणून केले अनेक पुरस्कार प्रधान … ५
प्रमोद न सूर्यवंशी
मालाड मुंबई