आमदार वैभव नाईक, संदेश पारकर यांची मागणी
आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत पणन हंगाम २०२१-२२ मध्ये विकेंद्रीत धान व भरडधान्य योजनेतर्गत धान व भरडधान्य (भात) खरेदी पोर्टलवर शेतकऱ्यांची नोंदणी करण्यास ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र पोर्टलवर अनेक शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी झालेली नसल्याने पुन्हा मुदत वाढ देण्याची मागणी आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक व शिवसेना नेते संदेश पारकर यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन केली या मागणीची तात्काळ दखल घेत ना. छगन भुजबळ यांनी धान खरेदी पोर्टलवर ऑनलाईन नोंदणीसाठी शेतकऱ्यांना ३१ जानेवारी २०२२ पर्यत मुदत वाढ देण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर कुडाळ एमआयडीसी येथील बजाज राईस मिलला भात भरडाई करण्याचे केंद्र निश्चित करण्याची मागणी आ. वैभव नाईक यांनी केली त्यावर देखील ना. भुजबळ यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.