You are currently viewing कुडाळ नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचा नववर्षानिमित्त स्वच्छतेचा संदेश…

कुडाळ नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचा नववर्षानिमित्त स्वच्छतेचा संदेश…

भंगसाळ नदीपात्राची केली साफसफाई; नागरिकांनी सहभागी व्हावे, संदीप कोरगावकर…

कुडाळ

येथील नगरपंचायत कर्मचारी नववर्षानिमित्त शहरातील नागरिकांना अनोखा स्वच्छतेचा संदेश दिला आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने नदीच्या ठिकाणी त्यांनी स्वच्छता अभियान राबविले. दरम्यान शहर स्वच्छ व सुंदर होण्यासाठी नागरिकांनी या अभियानात सहभाग घ्यावा आणि शहरातील सर्व प्रभागात अभियान यशस्वी करावे, असे आवाहन स्वच्छता निरीक्षक संदीप कोरगावकर यांनी केले आहे.

यावेळी स्वच्छता निरीक्षक संदीप कोरेगाव, मुकादम दीपक कदम, विलास मुणगेकर, रोहित परब, गोट्या कोरगावकर, अनिश सावंत, केतन पवार, सतीश जाधव, यशवंत कुडाळकर, सुभाष जाधव, आत्माराम बांबुळकर, संदीप कदम, किरण कदम, आत्माराम बांबुळकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा