You are currently viewing जिल्हयात 16 जानेवारी पर्यंत मनाई आदेश

जिल्हयात 16 जानेवारी पर्यंत मनाई आदेश

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात सद्यस्थितीत नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक2021, ग्रामपंचायत पोटनिवडणूक करिता 19 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. तसेच  राज्य परिवहन विभागातील विविध कामगार, कर्मचारी संघटना यांनी रा. प कर्मचारी  यांना शासनात विलिनीकरण करावे,या मागणी करता राज्यात संप पुकारला असून कर्मचारी व संघटना आक्रमक झालेले आहेत.जिल्हयात रा.प. कर्मचारी यांचा संप सुरु असून आंदोलने निदर्शने होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकरता येत नाही. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)  व 37 (3) नुसार 2 जानेवारी ते 16 जानेवारी कालावधीत मनाई आदेश  जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागामध्ये दि. 31 डिसेंबर 2021 रोजी पर्यंत जिल्हादंडाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी मनाई आदेश लागू केला आहे.

          या कालावधीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपूर्ण भूभागात खालील कृत्य करण्यास मनाई करित आहे.

कलम 37 (1)

Ø  शस्त्रे, साटे,तलवारी, भाले,दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यांसाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणे.

Ø  अंग भाजून टाकणार पदार्थ किंवा कोणताही स्फोटक पदार्थ घेवून फिरणे.

Ø  दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे जमा करणे किंवा तयार करणे.

Ø  व्यक्तींची किवा प्रेते किंवा आकृती किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, (ज्या कारणामुळे समालाच्या भावना दुखविली जाण्याची शक्यता असते.)

Ø  सार्वजनिक रितीने आक्षेपार्ह घोषणा करणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजवीणे.

Ø  सभ्यता अगर निती याविरुध्द अशी किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे अगर सोंग आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांत प्रसार करणे.

 

 

कलम  37 (३)

Ø सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाच अगर पाचहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव करणे मिरवणूका काढणे व सभा घेणे.

Ø हा हुकूम ज्या सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये व अधिकार बजावणीचे संदर्भात उपनिदीष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांना संबधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम पोलीस प्राधिकारी याची परवानगी घेतलेली आहे. अशा व्यक्तींना आणि लग्न  इत्यादी धार्मिक समारंभ, प्रेतयात्रा यांस लागू पडणार नाही .

         वरील कालावधीतील मिरवणूकांना परवानगी देण्यांचे अधिकार तसेच ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग तसेच त्यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांस व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांस राहील. या आदेशाचे जो कोणी उल्लंघन करील तो महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 2 =