स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने दिनांक 28 डिसेंबर 2021 रोजी जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते.सदर स्पर्धेच्या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी मा. प्रजित नायर माननीय शिक्षणाधिकारी डॉक्टर मुश्ताक शेख यांनी भेट देऊन स्पर्धकांना प्रोत्साहित केले.
इयत्ता पाचवी ते सातवी या गटातून आठ तालुक्यांच्या वतीने एकूण 24 रांगोळ्या साकारण्यात आल्या.
पावशी मिटक्याची वाडी शाळेतील कुमारी प्राची हिने हुतात्मा बाबू गेनू यांचे स्वातंत्र्य लढ्यातील बलिदान’ या विषयावर सुबक व बोलकी रांगोळी साकारली.सदर रांगोळीतून प्राचीने देशभक्ती ,असहकार, राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशीचा स्वीकार व परदेशी मालावर बहिष्कार ही पंचसूत्री मांडली.
या स्पर्धेचे परीक्षण कलाशिक्षक माननीय श्री चिऊलकर सर ,व माननीय श्री प्रशांत राणे सर यांनी केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय श्रीमती मानसी सुबोध सावंत ,श्री आनंद परूळेकर श्रीमती महानंदा चव्हाण श्रीमती आदिती मसुरकर श्री जनार्दन माधव कलाप्रेमी शिक्षकश्री सहदेव चिंधु पालकरआणि वर्गशिक्षक श्री अमीर अशोक सातार्डेकर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
वेताळ-बांबर्डे केंद्र, हुमरमळा प्रभाग, कुडाळ तालुका व सिंधुदुर्ग जिल्हा या स्तरावर ती चढत्या श्रेणीमध्ये यश संपादन करीत गेली.
या आनंददायी यशामागे प्राचीचे पालक ,शाळा व्यवस्थापन समिती,शिक्षक पालक संघ, माता पालक संघ ,पोषण आहार समिती,अंगणवाडी ताई, मा.केंद्रप्रमुख श्री भिकाजी तळेकर सर ,कुडाळ गटशिक्षणाधिकारी माननीय श्रीमती सुनिता भाकरे मॅडम या सर्वांच्या शुभेच्छा व प्रेरणा लाभदायी ठरल्या.
पावशी गाव कुडाळ तालुका व सिंधुदुर्ग जिल्हा या सर्वस्तरावरून मिटक्याचीवाडी शाळेतील कुमारी प्राची सदानंद सावंत हिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.
प्राची व तिच्या मित्र-मैत्रिणींनी यापूर्वीही हात धुवा दिन , संविधान दिन, गणित दिन* अशा विशेष प्रसंगी लक्षवेधी रांगोळ्या साकारल्या आहेत.