जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री अरविंदजी ढवळीकर यांची अप्रतिम काव्यरचना
म्हणती आले वर्ष नवे जे काळा आधीन आहे
आज फक्त परी भिंतीवर केलेंडर नवीन आहे
जल बदले का बदलून पात्रा
काय बदलते जीवन यात्रा ,?
शोध अंतरी बघ् आंनदाचा साठा भरून आहे
आज फक्त परी भिंतीवर केलेंडर नवीन आहे
जमतील सारे सखे सोबती
नृत्य गायनी करतील मस्ती
क्षण सरता ते ज्योत आभासी जाते विझून आहे
आज फक्त परी भिंतीवर केलेंडर नवीन आहे
संस्कारांचे धन तुज पाशी
धरी न चिंता कधी मनाशी
चरण स्पर्श संतांचे जेथे ईश ही विलीन आहे
आज फक्त परी भिंतीवर केलेंडर नवीन आहे
आधी व्याधी जरी संकटे
सोडती न ते तुला एकटे
समाधिस्थ चैतन्य ब्रम्ह जे आजही पावन आहे
आज फक्त परी भिंतीवर केलेंडर नवीन आहे
अरविंद