बांदा
सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद
पूर्ण प्राथमिक शाळा कास नं.१या शाळेचा शतक महोत्सव एक जानेवारी २०२२ पासून सुरू होत आहे १९२२ सली स्थापन झालेल्या या शाळेला या वर्षी शंभर वर्षे पूर्ण झाली असून २०२२हे वर्ष शतक महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे या शतक महोत्सवाची सुरुवात एक जानेवारी २०२२ रोजी सत्यनारायण महापूजेने करण्यात येणार असून या दिवशी गावातील महिलांसाठी रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी शाळेत यापूर्वी सेवा बजावलेल्या शिक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे यादिवशी माजी विद्यार्थ्यांचा दशावतारी नाट्यप्रयोग संपन्न होणार आहे या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कास नं.१ शाळा शतक महोत्सव कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.