You are currently viewing शाळा झाराप कामळेवीरचे नेत्रदीपक यश

शाळा झाराप कामळेवीरचे नेत्रदीपक यश

झाराप :

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने वेगवेगळ्या गटात शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या.या स्पर्धा केंद्र ,प्रभाग, तालुका व जिल्हास्तरापर्यंत मर्यादीत होत्या.

जिल्हास्तरीय स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज सभागृह व  स्काऊट-गाईड भवन येथे मंगळवार 28 12 2019 बुधवार 29 12 2019 रोजी संपन्न झाल्या .या स्पर्धेत आमच्या झाराप कामळेवीर शाळेच्या दोन मुलांची निवड तालुका पातळी व पातळीवरून जिल्हा स्तरावर झालेली होती .यात इयत्ता पाचवी ते सातवी गटात निबंध स्पर्धेत कुमारी श्रेया प्रेमनाथ मांजरेकर हिने प्रथम क्रमांक व पाचवी ते सातवी गटात रांगोळी स्पर्धेत भार्गवी घनश्याम आळवे हिने तृतीय क्रमांक पटकावला.

यशस्वी विद्यार्थिनींचे शिक्षक व शाळा झाराप कामळेवीर ,शाळा व्यवस्थापन समिती कामळेवीर, सर्व पालक ग्रामस्थ, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांस कडून अभिनंदन होत आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 4 =