You are currently viewing केंद्रशाळा शेर्पेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार आमदार नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न

केंद्रशाळा शेर्पेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार आमदार नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न

कणकवली

ग्रामपंचायत शेर्पे तालुका कणकवली च्या वतीने शेर्पे गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला . त्यामध्ये सन 2020 -21 मध्ये केंद्रशाळा शेर्पे मधील इयत्ता पाचवीच्या वर्गातील शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 3 विद्यार्थी 200 पेक्षा जास्त गुण मिळवून गुणवंत झाले होते . या सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ कणकवली मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते संपन्न करण्यात आला .शिष्यवृत्ती परीक्षा गुणवंत विद्यार्थी -अथर्व सत्यविजय सावंत – 254 गुण , सिद्धी संजय गर्जे -218 गुण ,व सिद्धी संजय गर्जची नवोदय विद्यालयात निवड झालेली आहे .चिन्मय दशरथ शिंगारे -214 गुण तर जय सुभाष देवधर हा शिष्यवृत्ती परीक्षा पात्र झालेला आहे .या सर्व विद्यार्थ्यांना .सरपंच ग्रामपंचायत शेर्पे यांच्या वतीने भेट वस्तू देऊन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला .याप्रसंगी उपस्थित अध्यक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग संजना सावंत ,कणकवली सभापती मनोज रावराणे , माजी वित्त व बांधकाम सभापती रवींद्र जठार, माजी सभापती कणकवली दिलीप तळेकर ,माजी महिला बालकल्याण समिती सभापती श्रीम. वंदना वळंजू ,निशा गुरव सरपंच शेर्पे ‘अरुण ब्रह्मदंडे उपसरपंच शेर्प ‘शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलास पांचाळ आदी उपस्थित होते .विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक दशरथ शिंगारे, अमोल भंडारी , राजू गर्जे यांचे अभिनंदन करून शाल श्रीफळ कोरोना योद्धा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला .

प्रतिक्रिया व्यक्त करा