विश्वास न ठेवण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी :
जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या नावे executivedirector4182@gmail.com या ई-मेल आयडीवरून खोटे मेल विविध कार्यालयांना पाठविले जात असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे. तरी सदर ई-मेल आयडीवरून आलेल्या मेलवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे. तसेच याबाबत पोलिसांना तपास करुन कारवाई करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.