सदाबहार काव्यांजली , कवितांजली ग्रुप च्या सदस्या लेखिका कवयित्री सौ स्वाती गोखले यांची अप्रतिम काव्यरचना
एकच भाव
माझ्या मन मंदिरी
असावी साजिरी
जीवनगाथा…
माझ्या प्रीतमंदिरी
फक्त तू वसावे
मी राहावे
निश्चिंत…
मनीची ओढ
स्वस्थ बसू देईना
आणि करमेना
मला…
वाट पाहतात
माझ्या नयनातील भाव
घेतात ठाव
तुझाच…
तूच आहेस
माझ्या मन मंदिरी
कसा अंतरी
व्यापलेला…
आजच्याच दिवशी
तू पाहिलेस मला
मी तुला
आवडले…
माला घातलीस
गळ्यात तू माझ्या
मी तुझ्या
हृदयी…
आठवले आज
ते सारे दिवस
मंतरलेला सहवास
एकमेकांचा…
हातात हात
गुंफला मी तुझ्या
मनात माझ्या
तूच…
असाच राहा
माझ्या मन मंदिरी
आनंद ऊरी
दोघांच्या…
सौ.स्वाती गोखले.
पुणे.