जि प महिला बालकल्याण सभापती शर्वाणी गावकर यांच्या हस्ते शुभारंभ
सावंतवाडी
सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड जकातनाका अंगणवाडी स्मार्ट अंगणवाडी म्हणून तालुक्यातून जाहीर करण्यात आली असून त्याचा शुभारंभ महिला बालकल्याण सभापती शर्वाणी गावकर यांच्या हस्ते करण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद च्या शंभर अंगणवाड्या या स्मार्ट अंगणवाडी म्हणून तयार करण्यात येणार आहेत. यातील सावंतवाडी तालुक्यातील पहिली स्मार्ट अंगणवाडी म्हणून मळेवाड जकातनाका येथील अंगणवाडीला मान पहिला मिळाला असून या स्मार्ट अंगणवाडीचे महिला व बालकल्याण सभापती शर्वाणी गावकर यांच्या हस्ते व सावंतवाडी पंचायत समिती सभापती निकिता सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करून शुभारंभ करण्यात आला.
यावेळी सर्व मान्यवरांना सौभाग्यवतीनी ओवाळून त्यांचे स्वागत केले. तसेच मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करुन व सभापती गावकर यांच्या हस्ते फीत कापून स्मार्ट अंगणवाडीचा शुभारंभ करण्यात आला. शुभारंभ प्रसंगी आपले मत व्यक्त करत असताना जिल्हा बाल विकास अधिकारी भोसले यांनी मळेवाड जकातनाका अंगणवाडी तालुक्यातील पहिली स्मार्ट अंगणवाडी म्हणून शुभारंभ करण्यात आला असून याबद्दल गावातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस व स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे कौतुक केले. गावातील स्थानिक लोकप्रतिनिधी ग्रामस्थ व पालक यांच्या एकजुटीने हे शक्य झाले असून आजचा हा शुभारंभाचा कार्यक्रम दिमाखदार स्वरूपात संपन्न झाला असे मत व्यक्त केले .
तर माजी उपसभापती व विद्यमान पंचायत समिती सदस्य संदीप नेमळेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना गावातील ग्रामस्थ हे गावातील प्रत्येक कार्यक्रम एक दिलाने एक जुटीने साजरा करतात. अंगणवाडी हा आपल्या शिक्षणाचा पाया आहे आणि हा पाया मजबूत होणे फार गरजेचे असून यासाठी शासन अनेक उपक्रम राबवत असून अंगणवाडी सेविका मदतनीस चांगले काम करत आहेत स्मार्ट अंगणवाडी मध्ये टीव्ही स्क्रीन च्या माध्यमातून मुलांना नवनवीन अभ्यासाचे उपक्रम नवनवीन गोष्टी पाहता येतील तसेच आरोग्यविषयक किट उपलब्ध करून दिले असून मुलांचे आरोग्य चांगले राहावे यासाठीही त्याचा फायदा होईल.
प्रभारी सरपंच हेमंत मराठे हे गावाच्या विकासासाठी मेहनत घेत असून त्यांच्या प्रयत्नांना नक्की यश येणार असून मळेवाड कोंडूरे गावाचा कायापालट नक्की होईल असा विश्वास व्यक्त करत सावंतवाडी पंचायत समिती कडून गावाला निधी देण्यासंदर्भात सभापती सावंत यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.त्यानंतर सभापती निकिता सावंत यांनी आपल्या भाषणात मुलांना शिक्षण चांगलं मिळतं ही काळाची गरज असून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अंगणवाडी च्या मार्फत मुलांना चांगले शिक्षण दिले जात आहे अंगणवाडी ची मुलं हे आपल्या समाजाचा पाया असून त्यांना चांगलं शिक्षण व चांगलं ज्ञान मिळणं हे गरजेचे आहे. मुलाला शिक्षणाची आवड निर्माण होण्यासाठी अंगणवाडी हा पाया आहे आणि तो पाया मजबूत असणं गरजेचे असल्याने शासनाकडून अंगणवाडीतील मुलांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा शैक्षणिक सेवा देण्याचा मानसून स्मार्ट अंगणवाडी झाल्याबद्दल या अंगणवाडी चे कौतुक केले प्रभारी सरपंच हेमंत मराठे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जिल्हा परिषद ने स्मार्ट अंगणवाडी म्हणून सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड गावातील अंगणवाडी ला पहिला मान दिल्याबद्दल जिल्हा परिषद सभापती गावकर व जिल्हा परिषद चे आभार मानले तसेच गावाच्या विकासासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीने जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा अशीही मागणी केली.
गावातील अंगणवाडी सेविका मदतनीस अतिशय चांगले काम करत असून मुलांना चांगले शिक्षण देत असल्याचेही मराठे यांनी सांगितले येत्या शैक्षणिक वर्षात गावातील अंगणवाडीतील मुलं यांना ग्रामपंचायतच्या माध्यमातून ड्रेस कोड दिला जाईल अंगणवाडीतील मुलं ही इंग्लिश मिडीयम च्या मुलांच्या बरोबरीनं त्यांचा पोशाख व नाविण्य पणा दिसावा हा मागचा येथे असून एक वेगळी शिस्त या मुलांच्या मनात रुजवण्याचा ई-मानस आहे तसेच गावातील कुपोषण मुक्त करण्यासाठी अंगणवाडीतील मुलांची बाल रोग तज्ञ यांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी करून त्यांना आरोग्य सेवा दिली जाणार आहे यासाठी पालकांनीही सहकार्य करावे असेही आवाहन मराठे यांनी केले. सभापती गावकर यांनी मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी विशेष निधी दिला असून मळेवाड मापसेकर वाडी अंगणवाडीसाठी ही डोंगरी विकास योजनेतून निधी उपलब्ध केल्याने ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून गावकऱ्यांचे मराठी यांनी आभार मानले.
सभापती शर्वाणी गावकर यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०० अंगणवाड्या या स्मार्ट अंगणवाड्या करण्याचा जिल्हा परिषद चा मानसून सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड गावातील मळेवाड जकात नाका अंगणवाडी ही स्मार्ट अंगणवाडी होण्याचा पहिला मान दिला आहे स्मार्ट अंगणवाडी बरोबरही अंगणवाडीतील मुलं स्मार्ट असणारी तेवढेच गरजेचे असून त्यासाठीही जे किट उपलब्ध करून दिले आहे त्यांच्या माध्यमातून मुलांचा बौद्धिक विकासाबरोबरच आरोग्यासाठीही सदरचे किट लाभदायक ठरणार आहे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शैक्षणिक अनेक उपक्रम राबवले जात आहेत अंगणवाडी सेविका मदतनीस व त्यांचे अधिकारी हे चांगले काम करत असून चांगली मुलं या अंगणवाडीतून घडावेत असे मत व्यक्त करत असताना अंगणवाडीतील मुलं ही आपल्या समाजाची आणि देशाचा पाया आहे आणि तो पाया मजबूत होण्यासाठी अंगणवाडीची जबाबदारी फार मोठी असल्याने अंगणवाडीतील मुलांना जास्तीत जास्त शैक्षणिक सेवा व सुविधा देण्याचा जिल्हा परिषदेचा मानस आहे.
मळेवाड कोंडूरे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चांगले काम होत असून भविष्यात गावाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन गावकर यानी दिले. या शुभारंभ प्रसंगी जि प सदस्य श्वेता कोरगांवकर, उन्नत्ती धूरी, प स सदस्य गौरी पावसकर,ग्रामविकास अधिकारी अनंत गावकर, ग्रा प सदस्य मधुकर जाधव,महेश शिरसाठ,स्नेहल मुळीक,गिरिजा मुळीक,सानिका शेवडे, तात्या मुळीक,केन्द्र प्रमूख देसाई,मुख्याध्यापक मंजिरी मांजरेकर, प्रकाश पार्सेकर, गोपाळ ऊर्फबाबल नाईक, प्रकाश राऊत,नंदू नाईक, त्रिंदाद गुरुजी, परशुराम मुळीक, मदन मुरकर, संध्या मोरे ,शीला देऊलकर
सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस,आशा, पालक, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.