फोंडाघाट
फोंडाघाट बाजारपेठेपासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर २५ ते ३० फूट खोल दरीत कुजलेल्या अवस्थेत अज्ञात इसमाचा मृतदेह व दुचाकी आढळून आली आहे. ही घटना आज उघडकीस आली. दरम्यान हा अपघात की घातपात, असा संशय व्यक्त होत असून त्या व्यक्तीची ओळख पटविण्याचे कार्य पोलिसांकडून सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित परिसरात दुर्गंधी येत असल्यामुळे घाटात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी घरीच वाकून पाहिले असता त्यांना दुचाकी व मृतदेह आढळून आला. यावेळी त्यांनी याबाबतची माहिती तेथील स्थानिक दुकान व्यवसायिकांना दिली. त्यानंतर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकाराला सात ते आठ दिवस उलटल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तर मृतदेहाच्या शेजारी MH- 12 HT 3958 या क्रमांकाची गाडी आढळून आली आहे. त्यानुसार पोलिसांनी त्या व्यक्तीची ओळख पटविण्यास सुरुवात केली असून हा अपघात, की घातपात, अशी चर्चा रंगू लागली आहे. तर घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने तो मृतदेह व दुचाकी बाहेर काढत ताब्यात घेतली.

