You are currently viewing नुतन अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत

नुतन अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत

सिंधुदुर्गनगरी

नुतन अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांच्याकडून स्वीकारला. जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे  स्वागत केले.

            श्री. बर्गे हे यापूर्वी 2009 ते 12 या कालावधीत जिल्ह्यात निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून होते. हिंगोली येथे अपर जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. आज त्यांनी सिंधुदुर्ग येथील पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे, कुडाळ प्रांताधिकारी वंदना खरमाळे, सावंतवाडी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − 12 =