You are currently viewing छत्रपती शिवराय

छत्रपती शिवराय

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य राष्ट्रीय प्रतिभा पुरस्कारित ज्येष्ठ लेखक कवी प्रो.डॉ.जी आर उर्फ प्रवीण जोशी यांची काव्यरचना

रायगडी च्या सिंह गर्जना
भवानी ती तलवार
स्वराज्य जयजयकार
असे हा शिवाचा अवतार ।। धृ ।।

स्वराज्याचा मंत्र देऊनी
बारा मावळ एक करुनी
मर्दमुकीचा धडा शिकवता
चढे तलवारीला धार
म्हणा हो स्वराज्य जयजयकार ।। 1 ।।

अस्त्र शस्त्र पाठ गिरवीत
गनिमीकावा नसा , नसात
दूरदृष्टीचे ध्येय आखता
होई लढाई ती आरपार
शिवाचा होई जयजयकार ।। 2 ।।

मोगल ,आदिल, क्रूर कर्मा
हर यवनाशी लढा देता
आग्र्याच्या त्या नजरबंदीतूनी
गरजला हा अवतार
बोला शिवाचा हा अवतार ।। 3 ।।

कित्येक किल्ले, हाती घेतले
फौजनाही शिक्षण दिधले
एकेक मावळा होई चुतर तो
लढे तो आरपार
बोला शिवाचा अवतार ।। 4 ।।

भवानी देवीचा कट्टर भक्त
महामेरू हा असे सशक्त
सह्याद्रीच्या कडे कपारीत
मराठा मोळा तय्यार ।। 5 ।।

 

प्रो डॉ जी आर उर्फ प्रवीण जोशी
नसलापुर ता रायबाग
बेळगाव

प्रतिक्रिया व्यक्त करा