सावंतवाडी
सावंतवाडी तालुक्यातील वेर्ले येतील वेर्ले प्रीमियर लीग पर्व (दुसरे) २०२१-२२ मधे अंतिम मेगाफायनल चा सामना मागच्या वर्षीचा विजेता संघ त्रिमुर्ती इलेवन आणि कुशाभाऊ फायटर्स यांच्या मधे झाला, फायनल मॅच मधे त्रिमुर्ती संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली.
प्रथम फलंदाजी करताना कुशाभाऊ संघाने 4 ओवर्स मधे संतोष राऊळ 10 बॉल 26 रन यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर 37 रनचे माफक आव्हान त्रिमुर्ती ईलेवन संघासमोर ठेवले होते.
त्रिमूर्ती ईलेवन संघाची सुरवात सुद्धा अतिशय खराब अशी झाली होती, 2 ओव्हर 18 रन 2 विकेट असताना, अटीतटीच्या लढती मधे स्वतः संघमालक बाळू गावडे यांनी आक्रमक भूमिका घेत 9 चेंडू 19 रनची महत्वाची खेळी करून पुन्हा एकदा प्रथम पारितोषिकचे दावेदार म्हणून सिध्द करून दाखविले.तर कुशाभाऊ फायटर्स संघाला उपविजेता पदावर समाधान मानावे लागले.
या पर्व मधे यंदा 10 संघाने सहभाग घेतला होता, तृतीय क्रमांक श्री. समर्थ योद्धा तर चतुर्थ क्रमांक रॉयल चीवारकर्स संघाने विजेते पद पटकाविले.
तसेच वैयतिक पारितोषीक
1]मालिकावीर- स्वप्नील राऊळ ( रॉयल चीवारकर्स)
2] उत्कृष्ट फलंदाज- संतोष राऊळ ( कुशाभाऊ फायटर्स)
3] उत्कृष्ट गोलंदाज- सौरभ राऊळ ( कुशाभाऊ फायटर्स)
4] सामनावीर- बाळू गावडे ( त्रिमुर्ती ईलेवन)
6] सर्वाधिक षटकार- संतोष राऊळ (१२ सिक्सर)
7] उद्योन्मुख खेळाडू- अक्षय राऊळ (आप्पा स्पोर्टस् वेर्ले)
8] शिस्तबद्ध संघ- कृष्णा रायडर्स
9] उत्कृष्ट शेत्ररक्षक- रामा राऊळ ( कृष्णा रायडर्स) यांनी
पटकाविले. तर पंच म्हणून श्री. कोरगावकर आणि श्री. बांदेकर यांनी उत्कृष्टरित्या काम पाहिले.तसेच सिंधुदुर्ग आणि गोवा मधील नामवंत समालोचक श्री. निलेश गाड यांनी सामालोचन चे काम पाहिले.