You are currently viewing नांदगाव प्रिमियर लीग क्रिक्रेट स्पर्धेचा मानकरी महापुरुष बेळणे

नांदगाव प्रिमियर लीग क्रिक्रेट स्पर्धेचा मानकरी महापुरुष बेळणे

नांदगाव

तालुक्यतील नांदगाव येथील नांदगाव प्रीमियर लीग पर्व(2) 2021क्रिकेट स्पर्धेचा अंतिम मानकरी महापुरुष बेळणे संघाने विजेतेपद पटकावले तर बेळणे येथीलच पावणादेवी या संघाने उपविजेतेपद पटकावले आहे .सतत तिनं दिवस नांदगाव येथील कोळंबा क्रिकेट क्लब आयोजित भव्य प्रिमियम लिग क्रिकेट स्पर्धा उत्साहात बहुसंख्य क्रीडा प्रेमिकांच्या उपस्थित संपन्न झाले आहे. आज अंतिम सामन्यात दोन्ही बेळणे येथीलच संघ होते . आणि यात महापुरुष बेळणे संघाने विजेतेपद पटकावले आहे.
या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक -21 हजार 21, डॉ संजय बिडये पुरस्कृत, व आकर्षक चषक द्वितीय पारितोषिक 15 हजार 21 पंढरी वायंगणकर पुरस्कृत व आकर्षक चषक इतर आकर्षक बक्षीसे खेळाडूंसाठी देण्यात आली आहेत. संघांना व वैयक्तिक आकर्षक सर्व चषक धोंडू शंकर मोरजकर यांच्या स्मरणार्थ भाई मोरजकर पुरस्कृत देण्यात आले आहेत.
यात वैयक्तिक आकर्षक पारितोषिक देण्यात आली यात सामनावीर व मालीकाविर सुर्या चव्हाण, उत्कृष्ट फलंदाज अँड प्रशांत तांबे, उत्कृष्ट गोलंदाज विनय तांबे आदींना पारितोषिक देण्यात आली आहे.
पारितोषिक वितरणा प्रसंगी व भारतीय जनता पक्षाचे तालूका सरचिटणीस व असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, भाजपचे शक्ती केंद्र प्रमुख भाई मोरजकर, उपसरपंच व मंडळाचे उपाध्यक्ष नीरज मोर्ये, मंडळ अध्यक्ष नारायण उर्फ़ भाई मोर्ये, राजू तांबे , मंगेश मोरये , मारुती मोरये, तुकाराम तुप्पट , अण्णा बिडये ,अमित मोरजकर केदार खोत, विव्ठल बिडये ,सिध्देश भाट ,गुरु मोरये ,विजय मोरये ,व खेळाडु व क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.
क्रिकेट स्पर्धेत समालोचक म्हणून राजा सामंत व बादल चौधरी यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली व रसिक प्रेक्षकांना आकर्षित केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × two =