You are currently viewing आ. नितेश राणे यांच्या विनंतीनंतर वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात डॉ. सयाजी धर्मे पुन्हा रुजू….

आ. नितेश राणे यांच्या विनंतीनंतर वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात डॉ. सयाजी धर्मे पुन्हा रुजू….

वैभववाडी

आमदार नितेश राणे यांनी केलेल्या विनंतीनंतर येथील ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉ. सयाजी धर्मे रुग्णालयात सेवेवर पुन्हा रुजू झाले आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक सचिव डॉ. एस. एच. पाटील यांनी डॉ. धर्मे यांना नियुक्तीपत्र दिले आहे.

येथील ग्रामीण रुग्णालयात काही दिवस डॉक्टर नसल्याने रुग्णसेवा पुरती कोलमडून गेली होती. याबाबतचे वृत्त वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होताच आमदार नितेश राणे यांनी रुग्णालयात तात्काळ आढावा बैठक घेतली. आढावा बैठकीला दाखल झालेल्या जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांनी रुग्णसेवेचा उडालेल्या बोजवारा बाबत खडसावून काढले होते. उपस्थित पदाधिकारी यांनी रुग्णांना चांगली सेवा देत असलेले डॉ. धर्मे हे वरिष्ठांच्या मनमानीपणाला कंटाळून राजीनामा दिल्याचे आमदार नितेश राणे यांच्या निदर्शनाला आणून दिले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा