You are currently viewing जखम

जखम

माझी लेखणी साहित्य मंच, शहापूर च्या सदस्या लेखिका कवयित्री विनिता कदम यांची अप्रतिम काव्यरचना

गतकाळाच्या स्मृतींचा त्रास होतो माझ्या मनात
तीच जखम भळभळते अजूनही माझ्या काळजात

वार होता खोल दडलेला शब्दांच्या विळख्यात
कोण जाणे कसा मिसळला रंग धारदार शस्त्रात
आहे तुझीच प्रतिमा माझ्या असह्य वेदनात
तीच जखम भळभळते अजूनही माझ्या काळजात

घाव झाले घावावरी त्या क्रुरतेच्या दालनात
कोणी कोणास सावरावे स्मशानातल्या प्रांगणात
लपून आहे एकेक हुंदका सुकून गेलेल्या जखमात
तीच जखम भळभळते अजूनही माझ्या काळजात

गल्लोगल्ली चाले तांडव अमानवी भयाण गावात
कोंडले कित्येक श्वास जल्लादांच्या बाजारात
वसंताने कसे फुलावे निर्माल्याच्या ढिगाऱ्यात ?
तीच जखम भळभळते अजूनही माझ्या काळजात

©️®️
विनिता कदम
७५०६३४५९५९

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 2 =