सावंतवाडी :
ख्रिसमस आणि थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन सावंतवाडी पालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी केले आहे. दरम्यान राज्यात “ओमीक्रॉन” रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे स्वतःच्या व परिवाराच्या सुरक्षेच्यादृष्टीने प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, ज्या नागरीकांचे लसीकरण झालेले नाही अशा नागरीकांनी आपले लसीकरण करुन घ्यावे तसेच मास्क-सॅनिटायझरचा वापर करावा, असेही आवाहन श्री.जावडेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून केले आहे.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, राज्यात ओमीक्रोन रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे ख्रिसमस आणि थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्बंध घालून दिले आहेत. त्याचे काटेकोर पालन शहरातील नागरिकांनी करायचे आहे. तर प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेऊन आपला आनंद साजरा करायचा आहे. त्यासाठी सर्वांनी कोरोनासंबंधी घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे यासंदर्भात नागरिकांनी खबरदारी बाळगावी, असे म्हटले आहे.