“काल के कपाल पर, लिखता मिटाता हूॅ….. गीत नया गाता हूॅ, गीत नया गाता हूॅ….. ”
प्रखर राष्ट्रवादाची सडेतोड भूमिका, देशाच्या अनेक समस्यांचा विशिष्ट आणि सकारात्मक भूमिकेतून विचार आणि चिंतन, राष्ट्रप्रेम, राष्ट्रीनिष्ठा आणि कोट्यवधी भारतीयांच्या मनामनात राष्ट्रीय चेतना जागृत करण्यासाठी आणि पंचवीसहून जास्त प्रादेशिक राजकीय पक्षांच्या मोट बांधून त्याना राष्ट्रहितासाठी विवेकाच्या आणि संयमाच्या धाग्यात बांधण्याची किमया करणारे भारतीय राजकारणातील भीष्म पितामह भारतरत्न आदरणीय अटलजींच जन्मदिवस.
शांततेचा संदेश जगाला देणाऱ्या येशूचा आणि अटलजींचा २५डिसेंबर हा एकच जन्मदिवस.. हा सुद्धा एक दुर्मिळ योग आहे.
संवेदनशील कवी, फर्डे वक्ते, परराष्ट्र धोरणाचे अभ्यासक, सर्वपक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन राष्ट्रहिताची मांडणी करणारे अटलजी, देशातील सर्वसमावेशक नेते अशा विविध रुपात या भारतवर्षाने अटलजी अनुभवले. भारतीय राजकारणात सर्वसंमती आणि धर्मनिरपेक्षता याचे उत्तम उदाहरण अटलजींनी घालून दिले. गुजरात मधील विनाशकारी भुंकपानंतर आपत्ती निवारण समितीचे उपाध्यक्ष पद मा. शरद पवार यांना देवून देशावर जेव्हा संकट येत तेव्हा एकदिलाने त्याचा मुकाबला करण्याचा संदेश त्यांनी दिला.
आजचे अतिशय गलिच्छ आणि सोयीचे आपमतलबी तत्वशुन्य राजकारण पाहिले की अशा परिस्थितीत अटलजी सारख्या हिमालयाची उंची असलेल्या नेत्याचे आवर्जून स्मरण होते.
तेरा दिवस, तेरा महिने आणि नंतर पाच वर्षाचा कार्यकाळ भुषविणाऱ्या आदरणीय अटलजींची कारकीर्द म्हणजे सोनेरी पान होते.
सुर्योदय कधीच थांबत नाही, अटलजींच्या स्मरणाशिवाय एकही दिवस जात नाही… अटलजीना ञिवार वंदन….
…. अॅड. नकुल पार्सेकर…
संस्थापक अध्यक्ष, अटल प्रतिष्ठान