You are currently viewing कोकणातील नद्यांचा गाळ काढण्यासाठी ज्यादा निधी देणार – विजय वडेट्टीवार

कोकणातील नद्यांचा गाळ काढण्यासाठी ज्यादा निधी देणार – विजय वडेट्टीवार

कोकणातील नद्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात गाळ साचला असल्यामुळे त्या उथळ झाल्या आहेत. त्यामुळे अतिवृष्टी झाली तर पूरस्थिती निर्माण होऊ लागली आहे. या नद्यांचा गाळ काढणे आवश्यक असून पुन्हा पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी सध्या 3 हजार 500 कोटींची तरतूद करण्यात आली असून त्यापैकी 80 कोटींचा निधी देण्यात आला आहे.

पण त्यापेक्षा जास्त निधीची आवश्यकता लागणार असून त्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.

रायगड जिल्ह्यात महाड शहरात जवळपास 3 हजार 400 व्यापारी असून सप्टेंबरमध्ये आलेल्या महापुरामुळे त्यांचे अतोनात नुकसान झाल्याची लक्षवेधी अनिकेत तटकरे यांनी मांडली. प्रसाद लाड यांनीही वाशिष्ठाr नदीसह कोकणातील नद्यांचा गाळ काढण्याची मागणी केली. गाळ काढण्याबाबत दिरंगाई करणाऱया जलसंपदा विभाग व कलेक्टर विभागावर कारवाई करणार का, इन्शुरन्स रिह्यू करण्यात दिरंगाई करणाऱयांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी लाड यांनी केली.

उपमुख्यमंत्री, वित्त विभागाशी चर्चा करणार

मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले, चिपळूण आणि महाडच्या नद्या अनुक्रमे वशिष्ठाr आणि सावित्री फारच उथळ झाल्या आहेत. मात्र कोणत्याही परिस्थितीत गाळ काढला जाईल. गाळ काढण्यासंबंधी काम जलसंपदा विभागाकडे आहे. त्यासाठी अनेक परवानग्या घ्याव्या लागणार आहेत. या नद्यांचा गाळ काढण्यासाठीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. अधिक लागणाऱया निधीसाठी उपमुख्यमंत्री आणि वित्त विभागाशी चर्चा करून निधी देण्यात येईल, असे वडेट्टीवार म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा