बरीच वर्षे हा रस्त्या होण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ संघर्ष करत होते व त्यांनी हा रस्ता होण्यासाठी ग्रामपंचायतीकडे जिल्हा परिषदेकडे वारंवार निवेदने देऊन लक्ष वेधले होते ग्रामस्थांची ही मागणी लक्षात घेऊन काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व स्थानिक ग्रामपंचायत सदस्य यांनी याबाबत पाठपुरावा करत जिल्हा नियोजन मधून काँग्रेस पक्षाच्या वाट्याला येणाऱ्या निधीतून या रस्त्यासाठी 12 लाख रुपयेचा निधी मंजूर करून दिला.
आज सगरतीर्थ येथील रस्त्याचे भूमिपूजन सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष इर्शाद शेख, उपसभापती सिद्धेश परब, माजी सभापती जगन्नाथ डोंगरे, काँग्रेस तालुका अध्यक्ष विधाता सावंत वेंगुर्ला शहर काँग्रेस अध्यक्ष प्रकाश डीचोलकर ग्रामपंचायत सदस्य प्रणय बागकर, स्मिता फर्नांडिस, पांडुरंग फोडनाईक, गायत्री गोडकर, रेडी जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष मयूर आरोलकर, उपसरपंच सुषमा गोडकरयांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सगरतीर्थ ग्रामस्थ रॅमि सोज, जॉन फर्नांडिस, सायमन डिसोजा, आमरोज सोज, अंतोनी डिसोजा,आगोस्तीन मेंडीस,रेनिना सोज, नेपोलियन सोज,आणोन सोज,अँडी सोज, स्वप्निल बागकर राजाराम बागकर, अल्जिरा मेंडीस, रोजिता पॉल, पावस्तीन फर्नांडिस,रोजीन सोज,जेनिफा सोज,सॅमेंता सोज,नेलिना फर्नांडिस, एलिना फर्नांडिस, रिटा मेंडीस, फॉरीन डिसोजा, ख्रिस्तलिन सोज, मेरसु पॉल, डेव्हिड पॉल, बॅन्जोमिन फर्नांडिस,इस्प्रस कामोलकर,अक्षय डोंगरे, हनुमंत डोंगरे,मेरी कामोलकर, बेनीत फर्नांडिस,जेरी सोज, रुपेश बागकर,केशव बागकर,गौरेश बागकर व इतर पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते