You are currently viewing दाणोली येथे कार चालकाने दिली पादचारी सनी फर्नांडिस याला जोरदार धडक

दाणोली येथे कार चालकाने दिली पादचारी सनी फर्नांडिस याला जोरदार धडक

सावंतवाडी

दाणोली येथे एका कार चालकाने पादचारी सनी फर्नांडिस(२८) याला जोरदार धडक दिल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. धडक देऊन कार चालक पसार झाला ,त्याला सावंतवाडी एस टी स्टँण्ड येथे पकडण्यात आले, जखमीवर सावंतवाडी कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की कोल्हापूरहून सिंधुदुर्ग शिरोडा च्या दिशेने जाणाऱ्या कार चालकाने दाणोली येथे एका पादचार्‍याला जोरदार धडक देऊन पसार झाला, सदरच्या कार चालकाला सावंतवाडी एस टी स्टँण्ड येथे ताब्यात घेण्यात आले असून त्याचे नाव अनिल गायकवाड असे आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 − 3 =