You are currently viewing कणकवली बांधकरवाडीतील हल्ला प्रकरणी ३ वाहने पोलिसांच्या ताब्यात…

कणकवली बांधकरवाडीतील हल्ला प्रकरणी ३ वाहने पोलिसांच्या ताब्यात…

कणकवली बांधकरवाडीतील हल्ला प्रकरणी ३ वाहने पोलिसांच्या ताब्यात…

कणकवली

बांधकरवाडी येथील चेतन दिलीप पवार (वय. २५) व त्याच्यासोबत असलेले सुनील चव्हाण यांच्यावर १० मार्चला रात्री ८ वाजता शासकीय ठेकेदारीच्या वादातून जीवघेणा हल्ला झाला होता. या गुन्ह्यात संशयितांनी वापरलेल्या ३ चारचाकी गाड्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. त्यामध्ये एक बोलेरो, एक स्विफ्ट कार आणि एक टाटा नेक्सन या गाड्यांचा समावेश आहे. याआधी पोलिसांनी घटनास्थळावर पंचनामा केला असता लाठया, काठया ताब्यात घेतल्या होत्या.

तसेच या हल्ल्यातील संशयित आरोपी रणजीत जाधव,लक्ष्मण सुळ ( रा. वळीवंडे, तालुका देवगड ) यांच्यासह ८ ते ९ जणांविरोधात कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने पोलिस कारवाई करत आहेत.अजून आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले नाही.अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे करीत आहेत.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा