You are currently viewing दोडामार्ग नगरपंचायतीच्या चार प्रभागांसाठी आरक्षण सोडत जाहीर…

दोडामार्ग नगरपंचायतीच्या चार प्रभागांसाठी आरक्षण सोडत जाहीर…

प्रभाग ४ व ८ सर्वसाधारण महिला; तर १ व १० सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित…

दोडामार्ग

येथील नगरपंचायतीच्या चार प्रभागांसाठी आज आरक्षण सोडत पार पडली. यात प्रभाग चार व आठ सर्वसाधारण महिला, तर प्रभाग एक व दहा सर्वसाधारण, असे आरक्षण जाहीर झाले आहे. ही सोडत प्रक्रिया उपविभागीय अधिकारी प्रशांत पनवेलकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी तहसिलदार अरुण खानोलकर, मुख्याधिकारी शिवराज गायकवाड, निवडणूक नायब तहसिलदार सत्यवान गवस, तसेच उमेदवार उपस्थित होते. शाळेच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते चिट्टी काढून सोडतीचा हा निकाल सर्वांसमक्ष जाहीर करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा