You are currently viewing सावंतवाडी तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत एकूण ७०.५६ % मतदान – तहसीलदार राजाराम म्हात्रे

सावंतवाडी तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत एकूण ७०.५६ % मतदान – तहसीलदार राजाराम म्हात्रे

निरवडेत सर्वाधिक, तर बांद्यात कमी मतदान…

सावंतवाडी

तालुक्यातील चार ग्रामपंचायतींसाठी आज पार पडलेल्या पोट निवडणुक प्रक्रियेत एकूण ७०.५६ % इतके मतदान झाले आहे. यात सर्वाधिक मतदान निरवडे ग्रामपंचायतीत ७४.४६ इतके, तर सर्वात कमी बांदा ग्रामपंचायतीत ६६.५७ इतके झाले आहेत. याबाबतची माहिती तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली.

तालुक्यातील बांदा, निरवडे, देवसू, सांगेली या चार ग्रामपंचायतींसाठीची पोट निवडणूक प्रक्रिया आज पार पडली. या निवडणूक प्रक्रियेत संबंधित भागातील मतदारांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळाला. यात सर्वाधिक मतदान निरवडे, तर कमी मतदान बांदा ग्रामपंचायतीत झाले आहे. देवसू ग्रामपंचायतीत ७०.०७ %तर सांगेली ग्रामपंचायतीत ७०.२२% किती मतदान झाले आहे. दरम्यान मतमोजणी प्रक्रिया उद्या तहसील कार्यालयात पार पडणार आहे. त्यामुळे कोण विजयी होतो ? याकडे सर्वांचेच लक्ष आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा