२२ जणांची माघार ; १८ प्रभागात एकास एक लढती
सतीश सावंत विरुद्ध विठ्ठल देसाई, राजन तेली विरुद्ध सुशांत नाईक यांच्यात होणार लढती
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी निवडणूकीसाठी उमेदवार अर्ज मागे घेण्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी २२ जणांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे या निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. येथील १९ जागांसाठी ६९ उमेदवार रिंगणात असून १९ पैकी १८ प्रभागात एकास एक लढत होणार आहे. केवळ कुडाळ तालुका शेती संस्था मतदार संघात तीन उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. नारायण राणेंचा भाजप प्रवेश आणि राज्यात स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या दृष्टीने या निवडणुकीत दोन्ही बाजूंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
अनुसूचित जातीचा किंवा अनुसूचित जमाती मतदारसंघात आत्माराम ओटवणेकर विरूध्द सुरेश चौकेकर यांच्यात लढत होणार आहे. यामध्ये नकुल पार्सेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. इतर मागास वर्गातील सदस्य मतदार संघात रवींद्र मडगावकर विरूध्द मनीष पारकर यांच्यात लढत होणार असून अतुल काळसेकर, नागेश मोर्ये, महेश पारकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास वर्गातील सदस्य मतदार संघात गुलाबराव चव्हाण व मेघनाद धुरी यांच्यात तसेच संलग्न नागरी सहकारी बँका नागरी पतसंस्था पगारदार नोकरांच्या सहकारी संस्था या मतदार संघात राजन तेली विरूध्द सुशांत नाईक यांच्यात लढत होणार आहे. याठिकाणी सतीश सावंत व दिलीप पारकर यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला.
संलग्न सहकारी पणन संस्था शेती प्रक्रिया संस्था व ग्राहक सहकारी संस्था या मतदारसंघात अतुल काळसेकर व सुरेश दळवी यांच्यात लढत होणार आहे. संलग्न औद्योगिक संस्था मजूर संस्था जंगल कामगार संस्था मोटार वाहतूक संस्था या मतदारसंघात गजानन गावडे व लक्ष्मण आंगणे यांच्यात तर मच्छीमार संस्था सर्व दुग्ध संस्था कुक्कुटपालन, वराहपालन जनावरे पैदास करणाऱ्या संस्था या मतदारसंघात महेश सारंग विरूध्द मधुसूदन गावडे अशी लढत होणार आहे. विणकर संस्था घरबांधणी संस्था देखरेख संस्था तसेच अंतर्भूत नसलेल्या सर्व सहकारी संस्था या मतदार संघात विनोद मर्गज विरुद्ध संदीप (बाबा) परब यांच्यात तर कायद्याखाली नोंदविलेल्या सभासद संस्था सर्व बिगर सहकारी संस्था व व्यक्ती सभासदांसह मतदारसंघात विकास सावंत विरुद्ध समीर सावंत अशी लढत होईल. कुडाळ तालुका सहकारी शेती पतपुरवठा मतदार संघात विद्याप्रसाद बांदेकर, प्रकाश मोर्ये, सुभाष मडव लढत होणार आहे.
यांचे उमेदवारी अर्ज मागे
राजन राणे, चंद्रकांत नाईक, गणेश राणे, नकुल पार्सेकर, अर्चना घारे सखाराम ठाकूर, दत्ताराम वारंग, विष्णू कुबल, दिलीप पारकर, सतीश सावंत, रामचंद्र मर्गज, मोहन परब, राजन तेली, चंद्रशेखर सावंत, विलास गावडे, सुगंधा साटम, अतुल काळसेकर, नागेश मोर्ये, महेश पारकर, सुशांत नाईक व सचिन देसाई यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.
सहकारी शेती पतपुरवठा तालुका मालवण मतदार संघात व्हिक्टर डान्टस विरुद्ध कमलाकांत कुबल, सहकारी शेती पतपुरवठा सावंतवाडी मतदारसंघात गुरुनाथ पेडणेकर विरुद्ध विद्याधर परब, शेती पतपुरवठा दोडामार्ग तालुक्यात प्रकाश गवस विरुद्ध गणपत देसाई, शेती पतपुरवठा देवगड तालुका मतदार संघात प्रकाश गोडस विरुद्ध अविनाश माणगावकर, सहकारी शेती पतपुरवठा तालुका वैभववाडी मतदारसंघात दिलीप रावराणे विरुद्ध दिगंबर पाटील यांच्यात लढत होणार आहे. तर शेती पतपुरवठा तालुका कणकवली मतदार संघात सतीश सावंत विरुद्ध विठ्ठल देसाई व शेती पतपुरवठा तालुका वेंगुर्ला मतदार संघात मनीष दळवी विरुद्ध विलास गावडे अशा लढती पाहायला मिळणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा महिला प्रतिनिधी मतदार संघात प्रज्ञा ढवण, अनिता राणे, अस्मिता बांदेकर, अनारोजीन लोबो यांच्यात लढत होणार असुन या मधून दोन महिला प्रतिनिधी निवडल्या जाणार आहेत. या मतदार संघातून अर्चना घारे व सुगंधा साटम यांनी उमेदवारी अर्ज उमेदवारी अर्ज मागे घेतला. सदरच्या उमेदवारांची अंतिम यादी बुधवारी दुपारी कुडाळ प्रांत कार्यालय येथे प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वंदना खरमाळे यांनी दिली.