कुडाळ
कुडाळ नगरपंचायत पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुक आज अतिशय शांततेत पार पडली. आज झालेल्या या मतदानात ४० उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. एकूण १३ प्रभागात झालेल्या मतदानाची टक्केवारी ७१.६२ आहे.
४१ उमेदवार १३ जागांसाठी निवडणूक रिंगणात उतरले होते. ९१७१ मतदारांची संख्या आहे. त्यात ७१.६२% मतदान झाले. ६५६८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. या निवडणुकीत एक-एक मत खुप महत्वाचे होते. हे लाखमोलाच मत मिळविण्यासाठी उमेदवारांनी भरपूर प्रयत्न केले. मागच्या निवडणुकीत मतदारराजाने भाजपला कौल दिला होता. आज झालेल्या या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीने या नगरपंचायतीवर दावा केला आहे.
यावेळी नेमकी का कोणाची सत्ता येईल याबाबत तर्कवितर्क केले जात आहेत. त्यामुळे मतदार राजाला आलय विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सायंकाळी ५.३० ला मतदान प्रक्रिया संपली. उमेदवारांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी शहराच्या बाहेर असलेल्या मतदारांना मतदानासाठी आणण्यात मोठे योगदान दिले. त्यामुळे मतदारांनी आपला मतदानाचा बजावला पवित्र हक्क बजावला. या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १२ अतिशय लक्षवेधी ठरत होता. याठिकाणी जि. प. चे माजी अध्यक्ष काका कुडाळकर आणि भाजपच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे यांच्यात अतिशय अटीतटीची लढत असल्याने सर्वांचेच लक्ष या प्रभागात होते. त्याचबरोबर प्रभाग ९ मध्ये विद्ममान नगरसेविकां श्रेया गवंडे आणि साक्षी सावंत यांच्यात काटे की टक्कर पहायला मिळाली. तसेच प्रभाग क्रमांक ७ मध्ये डॉ. मयुर सदानंद शारबिद्रे आणि ॲड. विलास धोंडी कुडाळकर या दोन उच्चशिक्षित उमेदवारांमध्ये तुल्यबळ लढत होती. त्याचबरोबर भाजप बंडखोर उमेदवारांनी देखील आपला प्रभाव या निवडणुकीत दाखवला. आता या सर्वांचा निकाल १९ जानेवारीला लागणार आहे. सर्वांचे लक्ष याठिकाणी वेधले आहेत. प्रभाग निहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे. प्रभाग क्रमांक १ मध्ये ६७८ मतदारांनी हक्क बजावला असून ७४.८३% टक्के मतदान झाले. प्रभाग क्रमांक २ मध्ये ६८७ मतदारांनी हक्क बजावला. ७५.७७%, प्रभाग ४ (५९३) ७०.७६%, प्रभाग क्रमांक ५ (७५६) ७७.७७%, प्रभाग ६ (४७१) ७३.१९%, प्रभाग क्रमांक ७ (४७१) ७३.५९%, प्रभाग क्रमांक ८ (२२०) ७१.१९%, प्रभाग क्रमांक ९ (५६१) ६३.३१%, प्रभाग क्रमांक ११ (३३९) ७६%, प्रभाग क्रमांक १२ (५२६) ६७.९५%, प्रभाग क्रमांक १३ (३६४) ६५.७८%, प्रभाग क्रमांक १४ (३६४) ६५.७८ आणि प्रभाग क्रमांक १५ मध्ये (५७१) ७२.४६ % एवढे मतदान झाले.