You are currently viewing शॉर्टसर्किटमुळे कणकवली स्टेट बँकेच्या सिलींगला लागली आग

शॉर्टसर्किटमुळे कणकवली स्टेट बँकेच्या सिलींगला लागली आग

कणकवली

कणकवली स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सिलींगला एसी असलेल्या ठिकाणी दुपारी १२ वाजता शॉर्टसर्किट होऊन आग लागली. आग अचानक लागलेल्या आगीमुळे बँकेतील कर्मचारी व ग्राहकांची तारांबळ उडाली.अखेर वीज वितरण कनिष्ठ अभियंता एस.एस.कांबळी व रविकांत सातवसे यांनी त्वरित वीज पुरवठा खंडीत करण्यात आला.तसेच बँक व्यवहार काही काळ स्थगित करण्यात आले आहेत.

बँकेच्या सिलिंग वरील असलेल्या एसीच्या इलेक्ट्रिक वायरिंग, शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महावितरण कर्मचारी रविकांत सातवसे कार्य तत्परतेने वरिष्ठ अधिकारी श्री. कांबळे यांना कळवत ताबडतोब विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे अनर्थ टळला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा