You are currently viewing केंद्रशाळा शेर्पेला प्रिंटरची देणगी

केंद्रशाळा शेर्पेला प्रिंटरची देणगी

केंद्रशाळा शेर्पे तालुका कणकवली या शाळेला संतोष मनोहर शेलार माजी विद्यार्थी यांनीआपले वडील कैलासवासी मनोहर सदाशिव शेलार यांच्या पहिल्या स्मृतीदिन स्मरणार्थ वस्तुरूप देणगी स्वरुपात योगदान देऊ इच्छित होते .त्यांनी मुख्याध्यापक दशरथ शिंगारे यांना शाळेच्या गरजा संदर्भात विचारणा केली असता .मुख्याध्यापक यांनी शाळेच्या गरजा सांगितल्या त्यामध्ये रुपये 15000 चा कलर प्रिंटर त्यांनी शाळेला भेट देण्याचे मान्य केले .त्यानुसार प्रिंटर देणगी स्वरूपात त्यांची आई श्रीम. मंदाकिनी मनोहर शेलार यांच्या हस्ते नुकताच प्रिंटर शाळेला भेट दिलेला आहे .त्यांच्या या दातृत्वा मुळे केंद्रशाळा शेर्पे ची एक गरज पूर्ण झालेली आहे .त्यांच्या या योगदान व दातृत्वबद्दल शेर्पे गावात कौतुक होत आहे . प्रिंटर भेट देतेवेळी शाळेचे मुख्याध्यापक दशरथ शिंगारे , सुभाष शेलार, प्रकाश तेली ,प्रवीण शेलार , शिक्षक – अमोल भंडारी श्रीम. खुटाले ,आदी उपस्थित होते . शेर्पे सरपंच निशा गुरव,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलास पांचाळ , विस्तार अधिकारी सुहास पाताडे, केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल यांनी देणगीदार व देणगीसाठी प्रयत्न करणारे मुख्याध्यापक, शिक्षक , पालक यांचे अभिनंदन केले .

प्रतिक्रिया व्यक्त करा