*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार यांची दत्तजयंती उत्सवाच्या निमित्ताने लिहिलेली अप्रतिम काव्यरचना.
दिसले दत्तगुरू दिसले मग मी छान किती हसले ….
मनात माझ्या नित्य नित्यच दत्तगुरू वसले …
दिसले दत्तगुरू दिसले ….
ब्रम्हा विष्णु आणि महेश्वर
दु:ख्खावरती घालती फुंकर
धावा करती घरोघरीचे संकटात जे फसले …
दिसले दत्तगुरू दिसले …
मनामनांचा आधार सद् गुरू
नामस्मरणे दिन होई सुरू
खूप दिलासा जगताचा हो कल्पतरू भासले ..
दिसले दत्तगुरू दिसले …
गुरूविण नाही गती कुणाशी
छत्राविन हो सारे उदासी
प्रकाश पसरे मार्गातूनी हो गाव मनी वसले ..
दिसले दत्तगुरू दिसले …..
आहे दिलासा मोठा त्यांचा
चिंतामणी हो सकळ जनांचा
आधाराचा भक्कम वड हा कधीच ना रूसले
दिसले दत्तगुरू दिसले ….
महिमा गावी किती गुरूची
अनुभव देती देती प्रचिती
अनन्यभावे जाता शरण,भय मनी मग कसले ?
दिसले दत्तगुरू दिसले ….
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : १७ डिसेंबर २०२१