You are currently viewing शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची उद्या कुडाळात प्रचार सभा

शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची उद्या कुडाळात प्रचार सभा

कुडाळ :

 

कुडाळ नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रचार सभा शनिवार दि.18 डिसेंबर 2021 रोजी सायं. 6 वाजता गांधीचौक येथील बसस्थानकाच्या पटांगणात आयोजित करण्यात आली आहे.
यावेळी शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. उदय सामंत, माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, शिवसेना महिला जिल्हा संघटक सौ.जान्हवी सावंत आदींसह आघाडीचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी सर्व कुडाळ शहरवासियांनी तसेच आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना तालुका प्रमुख राजन नाईक, शहर प्रमुख संतोष शिरसाट, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, प्रभारी तालुकाध्यक्ष शिवाजी घोगळे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा