दोडामार्ग
राणी जानकीबाई वैद्यकीय संस्था सावंतवाडी यांच्यामार्फत दरमहा तेरवण येथे मोबाईल मेडिकल युनिटद्वारे भेट देऊन रुग्ण तपासणी करत होती, त्यामुळे तेरवण सारख्या दुर्गम गावात रुग्णांची सेवा करता आली. पण गेल्या ३ते ४वर्षात सदरची सेवा बंद झाली. त्यामुळे तेरवण ग्रामस्थांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले, त्यातच कोरोनाचे संकट, यामुळे तेरवण ग्रामस्थांची गैरसोय होत होती. त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी सभापती डॉ अनिशा दळवी यांच्याकडे भेटी दरम्यान व्यथा व्यक्त केली,
त्यावेळी सभापती डॉ. दळवी यांनी तेरवण येथे सदरची सोय पूर्ण होईल, असे सांगितले. डॉ. दळवी त्यांच्या प्रयत्नातून पुन्हा एकदा ही सेवा पूर्ववत सुरु होत आहे. दरमहा पुन्हा एकदा मोबाईल मेडिकल युनिट तेरवण गावात येणार आहे.