You are currently viewing आता किराणा दुकान, बेकरीमध्येही होणार वाईन विक्री?

आता किराणा दुकान, बेकरीमध्येही होणार वाईन विक्री?

आता किराणा दुकान, बेकरीमध्येही होणार वाईन विक्री?

बाजारात अनेक बेकरी उत्पादनांमध्ये वाईनचा उपयोग केला जात असतो. बहुतांश वाईन्समध्ये अल्कोहोलचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे दैनंदिन किराणाचं साहित्य मिळणाऱ्या दुकानातही वाईनची विक्री करण्यास परवानगी देण्याचा विचार राज्य सरकारकडून केला जात आहे.

अनेक ठिकाणी वाईन ही चवीसाठी वापरली जाते. यामुळे बिअरच्या धर्तीवर वाईनचीही विक्री किराणा दुकानात सुरू केली जाऊ शकते. राज्य सरकार त्यासंदर्भात एक अधिसूचना आणण्याचा विचार करत असून त्याबाबत परवानगी देण्याची तयारी सुरु केली आहे.

दरम्यान, दुकानांमध्ये एक लिटर वाईनमागे 10 रुपये अबकारी कर लावण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या निर्णयामुळं राज्य सरकारच्या तिजोरीत पाच कोटींची भर पडणार आहे. सध्या राज्यात दरवर्षी वाईनच्या 70 लाख बॉटल्सची विक्री होते. सरकारच्या नव्या धोरणामुळं हा आकडा 1 कोटींवर पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 1 =