मुंबई :
अलीकडच्या काळात अन्न, वस्त्र, निवारा या गरजाव्यतिरिक्त इंटरनेटही जनसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनली आहे. या इंटरनेटमुळे प्रत्येक जण सोशल मीडियावर कार्यरत असतो. व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम या हल्ली माणसाच्या जीवनातल्या अविभाज्य घटक बनले आहेत.
सोशल मीडिया द्वारे अलीकडेच काही महिन्यापासून कलाकार काय करतो ? काय स्वीकारतो ? त्यांची मतं काय ? त्यांची राहणीमान काय ? त्यांची जीवनशैली काय ? अशा अनेक सर्व गोष्टी जनसामान्यांना कळतात. याच सध्या सोशल मीडियाला मराठी अभिनेता सुबोध भावे कंटाळला आहे. काल बुधवारी दुपारी त्याने ट्विटरला एक पोस्ट टाकून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘आपण ट्विटरला अकाउंट डिलीट करत आहोत. आपल्या सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद मिळाला त्याबद्दल धन्यवाद. काळजी घ्या. मस्त रहा,’ अशा आशयाची पोस्ट त्यांनी केली आहे.
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या सुबोध भावे गेल्या काही दिवसांपासून घरीच आहे. काही दिवसांपूर्वी त्याला व त्यांच्यी पत्नी मंजिरी आणि मुलगा कान्हा यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावर त्यांनी मातही केली. यादरम्यान सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसोबत सुबोध भावे नेहमी संपर्कात होता. पण आता सततच्या वाढत्या ट्रोलिंगला कंटाळून त्याने ट्विटर अकाउंटला अलविदा करत, स्वतःच्या अकाउंट डिलीट केले आहे.
ट्विटरवरून बाहेर पडण्याची काही विशेष कारण नाही, पण कंटाळा आला आहे. वाढती नकारात्मकता याव्यतिरिक्त कुठलेही कारण नाही. त्या बदल्यात तो वेळ मी तर कुठेतरी घालवू शकेन, असेही त्यांनी म्हटले आहे. फेसबुक आणि इन्स्टाबाबत इतक्यात सांगू शकत नाही. पण कदाचित फेसबुक बद्दलही मी निर्णय घेऊ शकतो, अशी प्रतिक्रिया त्यांने व्यक्त केली आहे.
असे असले तरीही, सुबोध भावे आपल्या ‘कान्हाज मॅजिक’ या निर्मिती संस्थेद्वारे ‘शुभमंगल ऑनलाइन’ या मालिकेची निर्मिती करत आहे. शुभमंगल ऑनलाईनच्या माध्यमातून एक हलकीफुलकी कथा येऊन सुबोध भावे प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. यामध्ये सायली संजीव व सुयश टिळक ही नवीन जोडी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.