You are currently viewing सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानकडून सावंतवाडी कारागृहात मोफत आरोग्य शिबिर…

सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानकडून सावंतवाडी कारागृहात मोफत आरोग्य शिबिर…

सावंतवाडी

सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने समाजातील सर्व घटकांसाठी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. कारागृहातील बंदिवानही समाजाचाच भाग असून सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २ येथील बंदीवानांसाठी सिंधुमित्र प्रतिष्ठानच्यावतीने निःशुल्क आरोग्य व चिकित्सा शिबिराचे आयोजन करून या शिबिरात सुमारे ६० बंदिवानासह कर्मचारी व अधिकारी यांची प्राथमिक तपासणीसह ब्लड शुगर तपासण्यात आली. त्यानंतर
औषधोपचारही निःशुल्क उपलब्ध करून देण्यात आले.

सिंधुमित्र प्रतिष्ठानच्यावतीने यापूर्वी सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २ येथे अनेक उपक्रम बंदिवान बंधू – भगिनींसाठी राबविले आहेत. मनोरंजनासाठी टीव्ही देण्यासह सुमारे अडीज वर्षे प्रत्येक मंगळवारी प्रार्थना, योगा, खेळ आदी कार्यक्रमांचे आयोजन केले. तसेच व्याख्याने आयोजनासह महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून खाऊ वाटप, आवश्यक साहित्य वाटप, योग दिन, आरोग्य शिबीर आदी अनेक उपक्रम राबविण्यात आले. तसेच सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा कारागृहात सुमारे ४ महिने प्रत्येक रविवारी बंदिवान बंधुकरिता प्रार्थना, योगा, खेळ आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात डॉ शंकर सावंत, डॉ नंददिप चोडणकर, डॉ विशाल पाटील, डॉ सौ मीना जोशी व डॉ प्रविणकुमार ठाकरे यांनी रुग्ण तपासणी केली. निःशुल्क निदान व चिकित्सा उपलब्ध करून दिल्याबद्दल कारागृह अधीक्षक आनंद टेंगले यांनी सिंधुमित्र प्रतिष्ठानचे कौतुक केले. यावेळी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते भार्गवराम शिरोडकर, संतोष नाईक, निलेश माणगांवकर, ओंकार देवधर, प्रकाश पाटील, सिद्देश मणेरीकर, रवी जाधव व दिपक गावंकर उपस्थित होते.

सिंधू मित्र प्रतिष्ठानच्या वतीने कारागृहातील बंदिवानांसाठी या शिबिरात ६० मास्कचे वितरण करण्यात आले. तसेच या बंदीवानांसाठी दैनंदिन वापरासाठी १०० मास्क कारागृह अधीक्षक आनंद टेंगले यांच्याकडे वितरित करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 − four =